Type to search

Featured सार्वमत

वळसे, पिंगळे, काकडे ठरविणार जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे उमदेवार

Share

विधानसभा : पुढील आठवड्यात इच्छुकांच्या मुलाखती

अहमदनगर (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक उमदेवारांच्या मुलाखती पुढील आठवड्यात 22, 23 अथवा 24 जुलै रोजी घेण्यात येणार आहेत. या मुलाखतीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेत आ. दिलीप वळसे, निरीक्षक देविदास पिंगळे आणि अंकुश काकडे यांची समिती गठित केली असून ही समिती जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार निश्‍चित करून तसा अहवाल प्रदेशाला देणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. जिल्ह्यात संगमनेर आणि श्रीरामपूर हे विधानसभा मतदार वगळता अन्य ठिकाणी काँग्रेस उमेदवार देणार की नाही, याबाबत स्पष्टता नाही. काँग्रेसकडे असणार्‍या शिर्डी, कर्जत-जामखेड या मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यास सांगीतलेे होते. त्यानूसार 22 इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज अनामत रक्कमेसह सादर केले आहेत. यात जवळपास सर्वच मतदारसंघात राष्ट्रवादीकडे इच्छुक आहेत. सादर झालेल्या अर्जानूसार मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती आ. वळसे, निरिक्षक पिंगळे आणि काकडे यांच्या समितीसमोर होणार आहेत. त्यानूसार संभाव्य उमेदवारांच्या नावांची शिफारस प्रदेशकडे करण्यात येणार आहे.

आ.संग्राम जगतापच उमदेवार
नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप हे कधी भाजप तर कधी सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र, जगताप पिता-पुत्र हे राष्ट्रवादीत राहणार असून तेच राष्ट्रवादीचे असतील, असा दावा पक्षाचे जिल्हा निरिक्षक अंकूश काकडे यांनी केला आहे.

येथे आहे डोकदुखी
राष्ट्रवादीकडून उमेदवारी करण्यास इच्छुक असणार्‍यांची संख्या मर्यादित असली तरी काही मतदारसंघांत इच्छुकांची संख्या अधिक आहेत. तेथे उमदेवार निश्‍चित करताना नेते आणि समितीला चांगलाच ताप होईल, अशी शक्यता आहे. पारनेरमध्ये पाच इच्छुक आहेत. कर्जत-जामखेडमध्ये पवार यांचे नातू रोहित पवार आणि विद्यमान महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, शेवगाव-पाथर्डीतून माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्यात स्पर्धा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!