‘देशभक्ती तुझे नाव सावरकर’ घोषणाबाजी; कॉंग्रेस राष्ट्रवादीचा विरोध, नाशिक महापालिकेत गोंधळ

‘देशभक्ती तुझे नाव सावरकर’ घोषणाबाजी; कॉंग्रेस राष्ट्रवादीचा विरोध, नाशिक महापालिकेत गोंधळ

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक महापालिकेच्या महासभेत आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधातील कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून गोंधळ उडाला.

आज महासभेचे कामकाज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाले असताना भाजप नगरसेवक योगेश हिरे, अजिंक्य साने, श्याम बडोदे, संभाजी मोरुस्कर यांनी सावरकर यांच्या संदर्भात प्रस्ताव मांडून राहुल गांधी यांचा निषेध करा अशी मागणी केली.

गांधी यांच्या निषेधार्थ सभा २० मिनिट तहुकुब करण्याची मागणी केली. दरम्यान, या मागणीला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार विरोध होता. प्रचंड गोंधळ उडाल्याने महापौरांनी सभा तहकूब केली.

यानंतर मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी ‘देशभक्ती तुझे नाव सावरकर अशी घोषणाबाजी केली. दुसरीकडे शिवसेना नगरसेवक मात्र, शांततेत बसलेले दिसून आले.

दरम्यान, महासभेत भाजपने नागरिकत्व कायद्यातील सुधारणाबद्दल केंद्र सरकारचे कौतुक करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक पावित्रा घेत विरोध केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com