राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी जाणून घ्या सविस्तर

0

मुंबई । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बारामती, सातारा, रायगडसह 12 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली.

आज मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यामधून उदयनराजे भोसले, कोल्हापूरमधून धनंजय महाडिक, रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

ठाण्यामधून आनंद परांजपे, ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील, परभणीमधून राजेश विटकर, जळगावमधून गुलाबराव देवकर यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

बुलडाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं राजेंद्र शिंगणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. हातकणंगलेची जागा आम्ही राजू शेट्टींसाठी सोडत असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले.

काही जागांबाबत काँग्रेससोबत चर्चा सुरु असून उर्वरित यादी आम्ही येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर करू अशी माहितीही पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

*