वळसे, पिचड यांच्या उपस्थितीत गुरुवारी एल्गार मोर्चा

0

राष्ट्रवादी नोंदवणार 2 लाख 80 हजार सभासद

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्ष वाढीसाठी क्रियाशील सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. सोमवारी या अभियानाचा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते आरंभ झाला असून प्रत्येक तालुक्यातून 20 हजार सभासद नोेंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
येत्या 5 तारखेला सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात जिल्हा प्रभारी आ. दिलीप वळसे, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, निरिक्षक अंकूश काकडे यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.
सोमवारी राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते पक्षाच्या क्रियाशिल सभासद नोंदणीस सुरूवात झाली. यावेळी ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, अजित कदम, संजय कोळगे, किसनराव लोटके, सबाजीराव गायकवाड, शिवाजी गाडे, हिम्मतराव धुमाळ, सुधीर म्हस्के, गणेश ठाणगे, सुरेश टाके, कपिल पवार, डॉ. बबन डोंगरे, राजेंद्र कोवटी, रेशमा आठरे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी प्रत्येक तालुक्यात 2 हजार क्रियाशिल सभासदांची नोंदणी करण्यात येणार असून एका क्रियाशिल सभासदाच्या मागे 10 सर्वसाधारण सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यात 2 हजार क्रियाशिल सदस्यातून 20 हजार सभासदांची नोंदणी होणार आहेत.
राष्ट्रवादीकडून तालुका पातळीवर शेतकर्‍यांसाठी स्वामीनाथ आयोग लागू करण्यात यावा, राज्य सरकारने शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, इंधन दरवाढ मागे घ्यावी याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येत आहे.
5 तारखेला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जिल्हाधिकार्‍यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, नगरपालिका, नगरपरिषदेचे नगरसेवक यांच्यासह विद्यमान पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष घुले यांनी दिली.
……….
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव शिवाजी गर्जे यांच्या मातोश्री यांना आदरांजली वाहण्यात आली.
……….

LEAVE A REPLY

*