राष्ट्रवादीच्यावतीने क्रांतीदिन धर्मनिरपेक्ष एकता दिन म्हणून साजरा

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रतिगामी, जातीयवादी व धर्मांध शक्तींचा बिमोड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांतीदिन धर्मनिरपेक्ष एकता दिन म्हणून पाळण्यात आला.
नगर येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी संजय झिंजे, नगरसेवक संभाजी पवार, निर्मलाताई मालपाणी, हनिफ जरीवाला, प्रकाश भागानगरे, भाऊसाहेब फुलसौंदर, रेखाताई जरे, लतिका पवार, फारुक रंगरेज, मारुती पवार, बाबासाहेब गाडळकर, मयुर विधाते, शौकत सय्यद, प्रा.बबन कांडेकर, मुसद्दीक मेमन, राहुल गाडळकर, जॉय लोखंडे, अमोल जाधव, प्रा.टेपाळे, प्रा.संजय लोखंडे, आरिफ पटेल, संजय लोखंडे, अशोक नांदूरकर, बजरंग भुतारे आदिंसह राष्ट्रवादी स्पर्धा परिक्षा अभ्यासिका केंद्राचे युवक-युवती उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

*