राष्ट्रवादीचा सटाण्यात बैलगाडी मोर्चा; विंचूर-प्रकाशा मार्ग रोखला

0
सटाणा | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आगामी काळात देखील शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात अधिक आक्रमक आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी दिला.

सध्याच्या परिस्थितीत शेतकरी हाच सर्वाधिक दुखी घटक असून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला केंद्र व राज्यातील भाजप – शिवसेना युती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

बैलगाडीवरून मोर्चा काढत रास्ता रोको करण्यात आल्याने काही काळ विंचूर प्रकाशा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष खेमराज कोर, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

या आहेत मागण्या : सरकारने जाहीर केलेली सरसकट कर्जमाफीची १०० % अंमलबजावणी व्हावी. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च व अधिक ५० % नफा मिळवून हमीभाव द्यावा. कृषीमालाची खरेदी करावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पत पुरवठा उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी नानाजी दळवी, वसंत भामरे, बापू मुळे, जिभाऊ सोनवणे, भास्कर सोनवणे, जयवंत पाटील, फईम शेख, बाळासाहेब भामरे, गिरीश भामरे, शिवा सोनवणे, जे.डी.पवार, संजय पवार, अमोल बच्छाव, अशोक शेवाळे, बाळासाहेब चव्हाण, डॉ.  येवलेकर, संभाजी चव्हाण, बाळासाहेब सोनवणे, माधव सोनवणे, नामदेव सावंत, वसंत पवार, केवळ देवरे, राकेश देवरे आदींसह राष्ट्रवादी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*