राष्ट्रवादीचा चक्का जाम; एक तास वाहतूक कोंडी

0
मनमाड (बब्बू शेख) | मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदौर महामार्गासह मनमाड-चांदवड, मनमाड-नांदगाव, मनमाड-येवला, मनमाड-मालेगाव या चार रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यांची त्वरीत समस्या दूर व्हावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे आज रविवारी मोर्चा  काढून मनमाड चौफुलीवर रस्ता रोको करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे चारही मार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांना एक निवेदन देण्यात आले

युवक क्रांतीच्या मैदानापासून दुपारी १२ वाजता आ.पंकज भुजबळ, तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, शहराध्यक्ष राजेंद्र पगारे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, गटनेते छोटू पाटील, नगरसेवक अमजद पठाण, रईस फारुकी, अर्पणा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेतृखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यलया पासून मोर्चा काढण्यात आला.

मोर्चा विविध मार्गावरून जावून मनमाड चौफुलीवर आल्यानंतर येथे रस्ता रोको करण्यात आला. यावेळी बोलताना आ.भुजबळ म्हणाले, मनमाड शहरातून पुणे-इंदौर ह्या महामार्ग जात असून या मार्गावर रोज हजारो वाहनांची वाहतूक होते.

याच मार्गावर बस स्थानकजवळ दोन पूल आहेत त्यावरून एकेरी वाहतूक होत होती. मात्र एक पूल हा कमकुवत झाल्यानंतर दोन महिन्या पासून हा पयल वाहतुकी साठी बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे सध्या एकाच पुलावरून वाह्न्ने जात असल्याने येथे वाहतुकीची प्रचन कोंडी तर होतेच शिवाय अपघाताचे प्रमाणात देखील वाढ झाली आहे तसेच मनमाड-चांदवड, मनमाड-नांदगाव, मनमाड-येवला, मनमाड-मालेगाव हे चारही रस्ते खड्डेमय झाल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे.

याबाबत आपण संबंधित मंत्री, सार्जनिक बांधकाम विभागचे अधिकारी यांच्याशी वेळोवेळी पत्र व्यवहार करून केला आहे तसेच विधी मंडळात हा प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे. तरी देखील या रस्त्यांचे खड्डे आज ही कायम असून दिवसदिवस त्यात वाढ होत असल्याचे पाहून आज पक्षाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्ते व पूल दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी माजी नगरसेवक धनंजय कमोदकर, हबीब शेख, योगेश जाधव, पापा थामस, पीटर फेरो, दिनेश पर्नाडे, अमोल कुलकर्णी शरद शिंदे, दिपाली कोरडे, शेर खान, अनुराग निकम, अशोक देवरे, दत्ता थोरात, विजू उबाळे, शाकीर शेख, प्रवीण जाकारी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

*