Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने; निफाड तालुक्यात बंद, सत्ताधाऱ्यांचा निषेध

Share

नाशिक | देशदूत डिजिटल चमू

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याप्रकरणी देशाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यापार्श्वभूमीवर आज सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला. नाशिकच्या राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सिन्नर शहरात मुख्यमंत्र्यांचे फलक जाळण्यात आले. तिकडे निफाडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. नैताळे गाव पूर्णपणे बंद आहे. शरद पवार यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षावर राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

यावेळी शरद पवार यांच्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल झाल्याचे निवेदन यावेळी देण्यात आले. निफाडच्या प्रांत अर्चना पठारे यांना माजी आमदार दिलीप बनकर, पंचायत समिती माजी सभापती सुभाष कऱ्हाड, मार्केटिंग फेडरेशनचे राजेंद्र डोखळे, जि. प. सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, राजेंद्र बोरगुडे, सागर कुंदे, नगरसेवक दिलीप कापसे आदींची उपस्थिती होती.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!