खड्डे मुक्तीसाठी ‘राष्ट्रवादी’ने घोटी टोल नाका बंद पाडला

0

नाशिक दि. १२ |  मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्ड्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी आज केली. महामार्गावरील खड्डे पूर्णतः भरले नाही म्हणून खैरे यांच्या नेतृत्वाखाली घोटी टोल नाका बंद पाडत आंदोलन करण्यात आले.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसात भरण्यात येतील असे लेखी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी खैरे व त्यांच्या शिष्टमंडळास दिले होते.

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (दि.१२) महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली. जवळपास ८० टक्के खड्डे भरले असून बाकी खड्डे भरण्याचे काम सुरु असल्याचे पाहणीत दिसले. परंतु, पूर्णतः खड्डे भरले न गेल्याने घोटी येथील टोल नाका बंद करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठिय्या मांडत आंदोलन केले. यांनतर वाहनांना टोल न भरता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोडले.

खड्ड्यांवर पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे भरले गेल्याने अशा खड्ड्यातील पेव्हर ब्लॉक काढून चांगल्या रीतीने खड्डे भरण्यास वेळ लागत आहे. महिन्याच्या अखेर पर्यंत संपूर्ण मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्ता खड्डेमुक्त होईल असे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी खैरे यांना सांगितले.

अपघातात मरण पावलेल्या पंढरी भागले (नांदगाव ता.इगतपुरी) व्यक्तीच्या कुटुंबियांना १२ लाखाची मदत टोल कंपनीने दिल्याने खैरे यांनी प्रकल्प अधिकारी खोडसकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अॅड.रविंद्र पगार, अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग, सोमनाथ बोराडे, उमेश खातळे, प्रल्हाद जाधव, योगेश निसाळ, मुख्तार शेख, सुनील वाजे, उदय जाधव, गोरख बोडके, शिवा काळे, बाळासाहेब गीते, पांडुरंग वारुंगसे, ज्ञानेश्वर फोकणे, मकरंद सोमवंशी, प्रफुल्ल पाटील, अॅड.चिन्मय गाढे,  रवींद्र गामणे, अमोल आव्हाड, किरण मानके, राहुल तुपे,

महेश भामरे, सुनील घुगे, निलेश पेलमाले, खंडू मटाले, भालचंद्र भुजबळ, संतोष भुजबळ, डॉ.संदीप चव्हाण, अमोल नाईक, महेश सोनवणे, सचिन कोरडे, राकेश जाधव, सचिन बिडकर, आकाश कोकाटे, प्रशांत राणे, स्वप्निल फुले, साहेबराव देशमुख, वैभव घाटोळ, समर सोनार, समाधान जेजुरकर, वैभव गाजरे, किरण भुसारे, प्रफुल्ल पवार, शांताराम झोले, दिलीप पवार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*