राष्ट्रवादी बुधवारी घालणार नोटबंदीचे प्रतीकात्मक ‘वर्षश्राद्ध’

0
नाशिक |  केंद्र सरकारने गेल्या वर्षी ५००आणि  १००० रुपयांच्या   नोटांवर बंदी आणली होती. या नोटबंदीला येत्या बुधवारी (दि. ८) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांसमोर वर्षश्राद्ध घालून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी दिली.

केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर करून ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. परंतु कोणतीही पुर्वतयारी न केल्याने देशभरातील करोडो नागरिकांना प्रचंड आर्थिक ताण तसेच हाल-अपेष्टांना तोंड द्यावे लागले होते.

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह सर्वच समाजघटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. या नोटबंदीच्या निर्णयाला  बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजता सर्व तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात पक्षाचे नेते,  कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी व हितचिंतक यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*