Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रNCB Raid : स्टेथोस्कोप, हेल्मेट, बांगड्या, टाय अन् हार्डडिस्कमध्ये लपवले ड्रग्ज

NCB Raid : स्टेथोस्कोप, हेल्मेट, बांगड्या, टाय अन् हार्डडिस्कमध्ये लपवले ड्रग्ज

मुंबई:

गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्जसंबंधी अनेक प्रकरणांचा भांडाफोड एनसीबीकडून (NCB)करण्यात येत आहे. याच साखळीमधील आणखी एक मोठं प्रकरण आता उघडकीस आलं आहे. आता ओव्हन, टाय, स्टेथोस्कोप, सायकलचं हेल्मेट, बांगड्या अशा वस्तुंचा वापर ड्रग्जची तस्करीसाठी करण्यात आला आहे माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे ((Sameer Wankhede)) यांनी दिली आहे. विविध कुरियर कंपनीद्वारे हे ड्रग्ज वेगवगळ्या युक्ता लढवून हार्डड्राईव्ह, स्टेथोस्कोप, सायकल हेल्मेट, बांगड्या, टायमधून पाठविण्यात येणार होते. यामुळे आता कुरियर कंपन्या रडारवर आहेत.

- Advertisement -

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

NCBने आता पत्रकार परिषद घेऊन दोन दिवसांपासून केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे (Sameer Wankhede)यांनी सांगितले की, दोन दिवसापासून मुंबईमध्ये एनसीबीची कारवाई सुरू होती. या कारवाईतील ८ आँपरेशनमध्ये ६ गुन्हे दाखल झालेले आहेत. या प्रकरणी एक परदेशी नागरिक ताब्यात असून त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे. जप्त केलेले ड्रग्जची किंमत सुमारे १३ कोटी आहे.

अंधेरीत स्टेथस्कोपमध्ये ड्रग्ज सापडलं आहे. हे ड्रग्ज ऑस्ट्रेलियाला जाणार होतं, अशी माहिती एनसीबीने दिली आहे. तसेच ओव्हनमध्ये देखील ४ किलो ड्रग्ज सापडलं आहे. १ किलो ड्रग्ज हे सायकलच्या हेल्मेटद्वारे ऑस्ट्रलियाला पाठवले जात होते. तर महिलाच्या बांगड्यांमध्ये देखील ड्रग्ज लपवून नेलं जात होतं. १७ ग्रँम ड्रग्ज कॉम्प्यूटरच्या हार्डडिस्कमध्ये लपवण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर टायमधून देखील ड्रग्जची तस्करी केली जात होती. जे ड्रग्ज टायमध्ये सापडलं ते न्यूझिलंडला नेलं जात होतं. तसेच फराळातूनही अमेरिकेमध्ये ड्रग्ज तस्करी सुरू होती, अशी माहिती एनसीबीने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या