नवरात्रोत्सवानिमित्त नेवासा तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
पाचेगावात 43 वा
पारायण संकीर्तन महोत्सव
पाचेगाव (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे सालाबादप्रमाणे नवरात्रोत्सवानिमित्त पारायण व कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी 5 ते 6 काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, सकाळी 7 वाजता ज्ञानेश्‍वरी पारायण, दुपारी 4 वाजता भावार्थरामायण कथा, सायंकाळी 5 वाजता हरिपाठ व रात्री 9 वाजता हरिकीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहात संपूर्णाताई नागपूरकर, शिवाजी महाराज देशमुख, बाळासाहेब महाराज रंजाळे, भगवान महाराज जंगले, कृष्णा महाराज उगले, गणेश महाराज गायकवाड, योगेश महाराज पवार, ताजोद्दीन महाराज, ज्ञानेश्‍वर महाराज शिंदे यांची कीर्तने होणार आहेत.
शनिवार दि. 30 रोजी सकाळी 9 वाजता भानुदास महाराज गायके (घोडेगाव) यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर ओंकार सखाहरी तुवर यांच्यावतीने महाप्रसाद होऊन सोहळ्याची सांगता होईल. परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन पाचेगाव ग्रामस्थ व भजनी मंडळाने केले आहे.
कौठ्यात पायी ज्योतीचे आज होणार आगमन

कौठा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील कौठा येथे जगदंबा तरुण मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने नवरात्र महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल मंदिरासमोर ज्ञानेश्‍वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवार दि. 20 रोजी मोहटादेवी येथून दुपारी 4 वाजता कौठा येथे पायी ज्योत येणार असून राशीनदेवी ते कौठा पायी ज्योत येणार आहे.

नवरात्रोत्सव काळात काकडा, ज्ञानेश्‍वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ व रात्री कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. दि. 21 रोजी सूरज महाराज आठरे, 22 रोजी ऋषीकेश महाराज थोरात, 23 रोजी रामनाथ महाराज देवडकर, 24 रोजी देविदास महाराज आडभाई, 25 रोजी संतोष महाराज पवार, 26 रोजी मच्छिंद्र महाराज निकम, 27 रोजी सुभाष महाराज सूर्यवंशी, 28 रोजी धुराजी महाराज काळे, 29 रोजी मनोहर महाराज सिनारे यांचे कीर्तन होईल. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता परमेश्‍वर महाराज खोसे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल.
जेऊर हैबती येथे उत्सवाची जय्यत तयारी

बालाजी देडगाव (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे यमाईमाता नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून या तयारी संदर्भात ट्रस्टचे उपाध्यक्ष निवृत्ती म्हस्के यांच्या निवासस्थानी बैठक होऊन त्यामध्ये नवरात्र उत्सव काळातील कार्यक्रम व इतर विषयावर चर्चा करण्यात आली.

यामध्ये देवीला जाणारा रस्ता मुरूम टाकून दुरुस्त करावा असे ठरले. तसेच नवरात्र काळात राबविण्यात येणार्‍या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष म्हस्के, सेक्रेटरी रावसाहेब खराडे, खजिनदार अण्णासाहेब जावळे, अशोक खराडे, अण्णासाहेब म्हस्के, दादा ताके, अजित खराडे आदी उपस्थित होते.
चांद्यात जगदंबा मंडळ ट्रस्टचा कीर्तन सोहळा

चांदा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील चांदा येथे जगदंबा नवरात्र उत्सव मंडळ ट्रस्टच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा मंदिर जुना बाजारतळ येथे कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या काळात पहाटे 4 वाजता काकडा भजन, सायंकाळी 5 वाजता हरिपाठ, सायंकाळी 6 वाजता देवीची आरती व रात्री कीर्तन आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.

सप्ताहात 21 रोजी रोहिदास महाराज चांदेकर, 22 रोजी हरेराम महाराज आडे, 23 रोजी मारुती महाराज झिरपे, 24 रोजी प्रवीण महाराज आंबेकर, 25 रोजी सुधाकर महाराज वाघ, 26 रोजी उद्धव महाराज बिराजदार, 27 रोजी सोनालीताई काळे, 28 रोजी चंद्रकांत महाराज खळेकर, 29 रोजी अतुल महाराज आदमाने यांची कीर्तने होतील. शुक्रवार 29 रोजी दुपारी 3 वाजता देवीची मिरवणूक निघेल. शनिवार 30 रोजी देविदास महाराज दहातोंडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल.

सलाबतपूर (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री जगदंबा माता नवरात्र महोत्सवात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरीपारायण सोहळ्यास गुरुवार दि. 21 ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे.
ज्ञानेश्‍वर मंदिर संस्थानचे विश्‍वस्त शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव पार पडणार आहे.

दि. 21 रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व आ. बाळासाहेब मुरकुटे यांचे हस्ते कलश व ग्रंथपूजन होणार आहे. दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत अशोक महाराज बोरुडे यांचे भावार्थ रामायणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दररोज रात्री 9 ते 11 राम महाराज डोंगर, अनिल महाराज पाटील, उद्धव महाराज आनंदे, पांडुरंग महाराज गिरी, कृष्णाजी महाराज नवले, रामानंदजी महाराज शिंदे, उल्हास महाराज सूर्यवंशी यांची कीर्तने होणार आहेत. शनिवार 30 सप्टेंबर रोजी शिवाजी महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

नवरात्र महोत्सव काळात शिरसगाव व परिसरातील वातावरण भक्तीमय बनते. देवीच्या मंदिरावरील विद्युत रोषणाई खास आकर्षण बनते. देवी मंदिरात दररोज सायंकाळी देवीचा जागर केला जातो. देवीच्या मंदिरात परिसरातील भाविक उपवास करण्यासाठी संपूर्ण 9 दिवस मुक्कामी असतात. काही भाविक संपूर्ण 9 दिवस काठीवरती रात्रंदिवस उभे राहून उपवास करतात. सातव्या माळेला येथे मोठी यात्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात.

LEAVE A REPLY

*