Type to search

आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

तयारी नवरात्रोत्सवाची : श्रीक्षेत्र मनुदेवी येथे तहसिलदारांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Share

चिंचोली ता.यावल (वार्ताहर) –

सातपुडा  निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी येथे येत्या २९ सप्टेंबर रविवार पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ  होत आहे. नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आढावा बैठकीचे दि.२५ बुधवार रोजी तहसिलदार  जितेंद्र कुवंर यांच्या अध्यक्षतेखाली मनुदेवी मंदिराच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात  आली  होती.

यावेळी निवासी नायब तहसिलदार आर.के.पवार, साबांवि, एसटी महामंडळ, वनविभाग , पोलीस  विभाग, आरोग्य  विभाग, महसुल विभाग व मनुदेवी  संस्थानचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती

मनापुरी जवळ होणार खाजगी व महामंडळ बसेस पार्किंग

सध्या पावसाचे दिवस असल्याने व जिल्हयात होत असलेल्या सततच्या पावसामुळे मनुदेवी जाणारे खाजगी वाहनांना पार्किंगसाठी मनुदेवी संस्थानने चार एकर जागेवर मानापुरी या आदिवासी  गावाजवळ व्यवस्था करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवात संपूर्ण दहा दिवस

बसेसची सोय करण्यात येणार असून चिंचोली पासून मनुदेवी जाणारे भाविकांना दि.२ ऑक्टोबर बुधवार पासुन  काही बसेस पार्किंग याठिकाणी सोडतील तर काही बसेस पार्किंग ते मनुदेवी मंदिर येथे सोडणार आहे.

यासाठी नवरात्रोत्सवात यावल आगाराच्या २० तर चोपडा रावेर अमळनेर भुसावल जामनेर जळगाव येथूनही १० बसेस मागविण्यात  येणार आहे. यासाठी पार्किंग स्थळी संस्थानचे वतीने पत्राचे शेड व उद्घोषणासाठी माईक स्पीकर आदी व्यवस्था तसेच भाविकांना ऊन पाऊस संरक्षणासाठी मंडप टाकण्यात  येणार आहे.

पार्किंग स्थळापासून मनुदेवी मंदिरापर्यंत दहा रूपये एसटी भाडे

खाजगी वाहनाना मंदिरापर्यंत बंदी

मनुदेवी येथे जिल्हाभरातून नवरात्रोत्सवात लाखो भाविक आपल्या  खाजगी  वाहनांनी  दर्शनाला  येतात. त्यामुळे दि.२ ऑक्टोबर  बुधवार पासुन खाजगी  वाहनाना मंदिरापर्यंत जाण्यास बंदी  करण्यात आली  आहे. तसेच मनुदेवी संस्थानचे वतीने पोलीस, एसटी कर्मचाऱ्यांना मोफत फराळ व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!