सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना अटक

0

नवी मुंबई पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे- गोरे यांचे अपहरण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना अटक केली आहे.

गेल्या दीड वर्षापासून अश्विनी बिद्रे कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या आहेत.

अश्विनी बिद्रे यांचे वडिल जयकुमार बिद्रे यांनी हायकार्टात आदेश देऊनही तपास करण्यात पोलिस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार केली होती. अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांनी घातपात केला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. अखेर पोलिसांनी कारवाई करत पनवेल ठाण्यातून अभय कुरुंदकरांना ताब्यात घेत अटक केली.

 

 

LEAVE A REPLY

*