Type to search

देश विदेश

‘वास्तुकलेची जागतिक राजधानी म्हणून ‘रियो डी जनेरो’ची निवड

Share

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को) याने २०२० सालासाठी आपली ‘वास्तुकलेची जागतिक राजधानी’ (World Capital of Architecture) म्हणून ब्राझील देशाच्या ‘रियो डी जनेरो’ या शहराची निवड केली आहे.

युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट संघटना (UIA) या संघटनांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये ‘वास्तुकलेची जागतिक राजधानी’ या शीर्षकाखाली नव्या उपक्रमाला संयुक्तपणे सुरूवात केली. याउपक्रमाच्या अंतर्गत रियो डी जनेरो या शहराची प्रथमच निवड करण्यात आली आहे. ब्राझिलीया हे राजधानी शहर उभारणार्या ऑस्कर निमेयर या प्रख्यात वास्तुकलाकाराची उभी मूर्ती ब्राझील देशात आहे.

युनेस्को
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा युनेस्कोकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह १९५ देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि १० सहकारी सदस्य आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!