आंतरराष्ट्रीय हॉकी मधून सरदार सिंगची एक्सिट

0

नवी दिल्ली : भारताचे सुप्रसिद्ध हॉकीपटू सरदार सिंगने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून नुकतीच निवृत्ती घेतली. माजी हॉकी कर्णधार सरदार यांनी बुधवारी आपला करिअरचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. सरदारजींनी सांगितले की, गेल्या 12 वर्षांपासून मी हॉकी खेळतो आहे आणि आता युवा खेळाडूंनी जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे.

सरदार म्हणाले की, त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत अपयशी झाल्यानंतर सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेतला. भारत सध्याच्या चॅम्पियन म्हणून आशियाई स्पर्धेत गेला होता, परंतु तेथे कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

LEAVE A REPLY

*