Type to search

Breaking News क्रीडा देश विदेश मुख्य बातम्या

विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर

Share

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बांगलादेशच्या विरोधातील पहिल्या टी२० सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा वाढविण्याचा निर्देश दिल्ली पोलिसांना दिला आहे.

दरम्यान ३ नोव्हेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी२० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दिल्लीत भारतीय संघाला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर एनआयएने खबरदारीच्या दृष्टीकोनातून पावले उचलली आहेत.

कोझिकोड येथील ‘ऑल इंडिया लष्कर’ हा दहशतवादी गट भारतीय कर्णधार विराट कोहली आणि स्टेडियममध्ये उपस्थित राजकीय नेत्यांना हानी पोहचवू शकतो, असे एका निनावी पत्रात म्हटले गेले आहे. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात कर्णधार म्हणून कोहली नसून रोहित शर्मा असणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!