नवरात्रोत्सव काळात मोहटा देवीला सव्वा कोटीचे दान

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत भाविकांनी पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीस तब्बल एक कोटी 27 लाख 12 हजार 838 रुपये रोख व वस्तू स्वरूपात दान अर्पण केले असल्याची माहिती जगदंबा देवी ट्रस्टने दिली.
शारदीय नवरात्र महोत्सव 21 सप्टेंबर 2017 ते 5 ऑक्टोबर 2017 रोजी मोजणी केली असता या दानपेटीमध्ये रोख स्वरुपात निघालेल्या रकमेचा तपशील पुढीलप्रमाणे – दानपेटी रोख जमा रक्कम ( 75 लाख 35 हजार 641), देणगी स्वरुपात रोख जमा रक्कम (30 लाख 23 हजार 894),
मुखवटा व कावडीचे पाणी व पालखी मिरवणुक हंगामा दान- (एक लाख 96 हजार 684), सोने वस्तू (15 लाख 9 हजार 641), चांदी वस्तू (4 लाख 47 हजार 408).
यावेळी देवस्थानाचे अध्यक्ष चेअरमन न्यायाधीश सौ. सुवर्णा पालवे, राजेंद्र भंडारी, सौ. सुनीता शिंदे, भास्करराव सांगळे, शिवाजीराव पालवे, अ‍ॅड. प्रसाद दराडे, गोरखनाथ ओव्हळ, अ‍ॅड. अशोक पाटील, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, देवस्थान कर्मचारी, रेणुका विद्यालयातील कर्मचारी, बँक कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*