नवापूरच्या पोलीस कर्मचार्‍यांनी घेतला ‘श्री’ विसर्जनाचा आनंद

0

नवापूर । दि.06 । प्रतिनिधी-नेहमीच आपल्या कर्तव्याची जवाबदारी अत्यंत शांततेत व शिस्तबध्द पद्धतीने पाळणारे मग दिवाळी असो का दसरा, गणेशोत्सव असो की नवरात्र रात्रोरात जागून आपल्या परिवारापासून दूर राहून दुसर्‍यांना संरक्षण देउन इतरांचा आनंदातच आपला आनंद मानणार्‍या व कितीही ऊन, पाउस व थंडी असो डयुटी म्हणजे डयुटी करणार्‍या नवापूर पोलिस बांधवांनी आज आपल्या परिवारासह गणेश विसर्जनाचा आनंद घेतला.

आपल्या लाडक्या आराध्य गणरायाला अत्यंत तन, मन व भक्तीभावाने गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला. या सर्व पोलीस बांधव अधिकारी आपल्या परिवारसह या उत्सवाच्या आनंद घेतांना अत्यंत आनंदी दिसत होते, जणू परिवारासोबत उत्सव साजरा करण्याचा आनंद कुछ और असतो असे अंगावर गुलाल व ढोल ताश्यांचा वाद्यात नाचतांना प्रत्येकाचा चेहर्‍यावर वेगळाच आनंद दिसत होता.

नवापूर शहर व तालुक्यातील गणेशोत्सवाच्या आनंद धुम धडाक्यात सुरू असून पाचव्या व सातव्या दिवसाचे गणेश विसर्जन अत्यंत शांततेत पार पडले.

या दहा दिवसाच्या काळात आपल्या आराध्य गणरायासोबत जनतेचे संरक्षणाची जवाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडणारे तालुक्यासह इतर शहरातून पोलिस बांधवांना गणेश विसर्जनाचा आनंद मिळावा म्हणुन तो देखील परिवारासोबत आज पोलिस लाईनमध्ये असलेल्या गणरायाचे विसर्जन अत्यंत भक्तीमय वातावरण करण्यात आले.

यावेळी पोलिस निरिक्षक विजयसिंह राजपूत, सहा.पो.नि.दिलिप बुवा, दिपक पाटिल, सुरेश भंडारी, पो उप नि.मोरे, संगिता कदम, पोलिस कर्मचारि महेंद्र नगराळे, योगेश थोरात, शांतीलाल पाटील, निजाम पाडवी सह पोलीस बांधव व परिवारातील बाल गोपालांची उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

*