नवापुरातील काव्य महोत्सवाने रसिकांना केले मंत्रमुग्ध, नऊ पुस्तकांचे प्रकाशन

0
नवापूर । येथे दोन दिवशीय काव्यमहोत्सवात अनेक कविंनी आपल्या कविता सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या काव्यमहोत्सवात 9 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पहिल्या दिवसाच्या काव्यशलाका या सत्राचे उद्घाटन नवापूरच्या नगराध्यक्षा सौ.हेमलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पहिल्या दिवसाच्या काव्यशलाका, काव्यरंग, खान्देशी कविता, काव्यरजनी या चारही सत्राचे अध्यक्ष, जेष्ठ गझलकार कालिदास चवडेकर, जेष्ठ साहित्यिक काशिनाथ भारंबे निर्मोही, अशोक शिंदे, प्रमोद बावीस्कर यांसह प्रमुख पाहुणे कृष्णा शिंदे, संदिप वाघोले, दीपक सपकाळ, मृदुला भांडारकर, प्रा.मुरलीधर उदावंत, विजय बागुल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व कविंनी खान्देशी कवितांसह इतरही कवितांची सुंदर मेजवानी दिली. काव्यरजनी या सत्रात सूरसंगित विद्यालयाचे संगीत शिक्षक भानुदास रामोळे यांच्यासह बालकिसन ठोंबरे, राज चव्हाण व कलाकारांनी संगितमय माहोल तयार करुन निवासी रसिकांची मने जिंकली. आलेल्या पाहुण्यांनी देखिल सादरीकरण करून सहभाग घेतला.

दुसर्‍या दिवशी काव्यप्रभात या सत्राचे अध्यक्ष सुनिता पाटील, प्रमुख पाहुणे लता पवार, जेष्ठ कवी यांच्या उपस्थितीत प्रभात समयी उत्तम कवितांच्या सादरीकरणाचा कवींनी आस्वाद घेतला.

10-30 पासूनच्या प्रकाशन सोहळ्यास जि.प.अध्यक्षा सौ.रजनी नाईक यांनी उद्घाटन करुन सुरुवात केली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक डॉ.पितांबर सरोदे, प्रमुख अतिथी जि.प.सदस्या संगिता गावीत, नगराध्यक्षा सौ.हेमलता पाटील, ज्येष्ठ गुजराती साहित्यिक सौ.कल्पना जितेंद्र देसाई (उच्छल,गुजरात), अजय पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, जेष्ठ साहित्यिक निंबाजीराव बागुल, मंगलाताई रोकडे, रमाकांत पाटील, काव्यप्रेमी शिक्षकमंच राज्याध्यक्ष आनंद घोडके, न्यायिक लढा पत्रकार संघ सेवा संस्थेचे विकास राऊत, साहित्यिक विशाल अंधारे (मुरुड), जेष्ठ कवी अविनाश वळवी (मुंबई), राजेंद्र साळूंखे, शिवाजी साळूंखे, या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते काव्यप्रेमी शिक्षकमंच तर्फे विविध पाच पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

बालगीतांचा आनंद झुला (सौ.जया नेरे), पणती जपून ठेवा (सौ.जया नेरे), एक काव्य तुला समर्पित (सौ.जया नेरे), प्रभातीचे रंग (श्रीमती विजया पाटील), शब्दरूप आले मुक्या भावनांना (श्रीमती विजया पाटील), लेखणी सरलाची (सौ.सरला साळूंखे), रानफुले (अरविंद वसावे), बरखा-कथासंग्रह (वासुदेव पाटील) या नऊ पुस्तकांचे प्रकाशन या काव्यमहोत्सवात रजनी नाईक, सौ.संगिता गावीत, डॉ.पितांबर सरोदे, निंबाजीराव बागुल, सौ.मंगलाताई रोकडे, विकास राऊत, नंदकुमार वाळेकर, रमेश चौरे, आनंद घोडके, कालीदास चवडेकर, राज्यसमिती सदस्य यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आलेल्या मान्यवरांपैकी विकास राऊत यांनी संयोजक सौ.जया नेरे, विजया पाटील, सरला साळूंखे यांचे गौरवपर संदेश लिखित प्रतिमा देवून शुभेच्छा दिल्यात. शिवाजी साळूंखे यांनीदेखिल नेरे दांपत्यांला सन्मानचिन्ह देवून गौरविले.

काव्यफुलोरा या शेवटच्या सत्राचे अध्यक्ष सदाशिव सुर्यवंशी (राज्याध्यक्ष, खान्देश साहित्य संघ) व प्रमुख पाहुणे रमेश बोरसे (संपादक खान्देश वानगी त्रैमासिक), ज्येष्ठ साहित्यीक विजय चव्हाण, रमेश महाले यांच्या उपस्थितीत उर्वरीत सर्व कवींनी आपल्या कविता सादर केल्यात. सदाशिव सुर्यवंशी यांच्या उत्कृष्ट अध्यक्षीय मनोगतातून काव्यमहोत्सवाची सांगता करण्यात आली. सौ.जया नेरे, दिपक सपकाळ, आनंद घोडके यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती विजया पाटील, सौ.सरला साळूंखे, महेंद्र पाटील, विष्णू जोंधळे, प्रविण पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी सौ.जया नेरे, सौ.सरला साळूंखे, विजया पाटील, राहुल साळूंखे, राजेंद्र साळूंखे, निंबाजी नेरे, शरद नेरे, पंकज वानखेडे, हर्षल, कपिल नेरे, प्रसाद, देवेन साळूंखे, हिमांशू पाटील, महेंद्र पाटील, महेश पुरकर, विजय बागुल, कवी करणसिंग तडवी, लक्ष्मीपुत्र उप्पिन, दिनेश वाडेकर, जागृती पाटील, आरती बावीस्कर यांसह काव्यप्रेमी शिक्षकमंच राज्य समिती, जिल्हा समिती सदस्य या सर्वांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*