Type to search

नवापुरात धुळीचे साम्राज्य हजारो लिटर पाण्याची नासाडी

maharashtra नंदुरबार

नवापुरात धुळीचे साम्राज्य हजारो लिटर पाण्याची नासाडी

Share
प्रकाश खैरनार
नवापूर । शहरातील रस्त्यांवर धावणार्‍या वाहनांमुळे परिसरात मोठया प्रमाणावर धुळ उडत आहे. या धुळीपासून संरक्षण व्हावे यासाठी नागरिक रस्त्यांवर मोठया प्रमाणावर पाणी शिंपडत असल्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. वाढत्या धुळीमुळे लोकांना दमासारखे आजार होवू लागले आहेत. यासाठी शहर धुळमुक्त करण्याची गरज आहे.

एकिकडे पूर्ण महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीदेखील नवापूर शहरातील नागरिकांना मात्र पालिकेतर्फे रोज एक वेळा पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे. हा पालिकेचे योग्य नियोजन, शहरवासीयांची पुण्याई, आ. सुरूपसिंग नाईक , माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांची दुरदृष्टी यामुळे हे शक्य झाले आहे. शहरातील काही भाग उंचावर असल्यामुळे व वाढती लोकसंख्येमुळे काही ठिकाणी पुरेसे पाणी पुरवठा कदाचित योग्य प्रमाणात होत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एवढे सर्व असूनही शहरातील रस्त्यावरिल धुळीला मात्र शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होतांना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्त्यांची दूरवस्था झालेली आहे. खड्ड्यांची संख्या दुप्पट, तिप्पट वाढ होत आहे. काही रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी, बाराचाकी, अवजड वाहने जोरात सुरू असून रस्त्यावर धुळीचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. या धुळीपासून वाचविण्यासाठी व आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी रोज या रस्त्यावर शेकडो लिटर पाण्याचा शिडकावा होत आहे. त्यामुळे पाण्याची बोंबाबोंब होत आहे. आज हेच रस्ते चांगल्या प्रतीचे राहिले असते तर कदाचित पाणी वाचले असते व अपव्यय झाला नसता. आधी मार्च अखेर व निवडणूक आचारसंहितेचा बहाणा दाखवून पालिका प्रशासन व पदाधिकार्‍यांनी रस्ते धुळमुक्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले दिसत नाही. काही रस्त्यांची मोजणी करून मोजमाप फक्त पालिका कार्यालयात पडले आहेत. काही रस्ते चार वेळा मोजमाप करून नागरिकांना समाधान केले जात आहे. प्रत्यक्षात मात्र ही मतदारांची फसवणूक केली जात आहे, अशी चर्चा सध्या शहरातील जागृत मतदारांमध्ये सुरु आहे.

आचारसंहितेनंतर पदाधिकारी काय करता याकडे नागरिकांचे लक्ष आहे. पण आज जो पाण्याचा शिडकावा होत आहे तो टाळण्यासाठी आधी शहर धुळमुक्त करणे आवश्यक आहे. या धुळीमुळे दमासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. या धुळीपासून वाचविण्यासाठी नागरिक नाईलाजाने रस्त्यावर पाणी शिंपडून आपले समाधान करत आहे. आधी शहर धुळ मुक्त करा व पाण्याचा अपव्यय टाळा अशी मागणी होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!