कौतुकास्पद : बस वाहकाने मिळवून दिली विसरलेली दागिन्यांची बॅग

0

नवीन नाशिक ( दिलीप कोठावदे) ता. २७

एसटी बसमध्ये विसरलेली दागिने व इतर मौल्यवान गोष्टी असलेली बॅग बस कंडक्टरच्या सतर्कतेने आणि प्रामाणिकपणामुळे संबंधित प्रवाशाला परत मिळाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

नवापूर डेपोची एस टी बस शिर्डी –नवापूर ही पहाटे पाच वाजता शिर्डी येथून निघते.  दिनांक २४ जुलैला मनमाड येथून एक मुस्लिम जोडपे बसमध्ये बसले होते व ते सटाणा येथे उतरले.

परंतु त्या वेळी त्यातील महिलेची दागिन्यांची बॅग गाडीतच राहिली.  बसचे वाहक संजय विश्वनाथ कोतकर, रा.पिंपळनेर यांना गाडीत ती आढळली.

श्री कोतकर यांनी नवापूर डेपो मॅनेजर यांच्याकडे ही बॅग प्रामाणिकपणे जमा केली. बॅगेत असलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे फोन लावून संबंधित जोडप्याला नवापूर येथे बोलावून घेऊन त्यांना बॅग परत करण्यात आली.

वाहक संजय कोतकर यांची आर्थिक स्थिती बेताची असून ते गरिबीतून वर आलेले आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे संबंधित प्रवाशांनी त्यांना वारंवार धन्यवाद दिले.

LEAVE A REPLY

*