Type to search

Featured सार्वमत

नगर: नावंदे यांना हटावल्यानंतर क्रीडा स्पर्धा यशस्वी

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर यांच्या कार्यपध्दतीच्या विरोधात जिल्ह्यातील क्रिडा संघटनांनी सुरू केलेले आंदोलन थंडावले आहे. क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केल्याने शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या आहेत.

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी वाडिया पार्क संकुलासाठी प्रवेश शुल्क सुरू केले, जलतरण तलावासाठी इ-निविदा मागविली, शालेय क्रीडा स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली.

वाडिया पार्क संकुलात भाडे न भरणार्‍या क्रीडा संघटनाच्या कार्यालयास सील केले होते. या निर्णयामुळे क्रीडा संघटनेचे पदाधिकारी नाराज झाले होते. या संघटनांनी क्रीडा अधिकारी नावंदे यांना हटाव मोहिम सुरू केली. त्यासाठी दि. 17 ऑगस्टला नगर-पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते. क्रीडा मंत्री अशिष शेलार यांना भेटून निवेदन दिले होते. नगरचा पदभार विजय संतान यांच्याकडे सोपविला. या कारवाईनंतर जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धाना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. तालुका आणि जिल्हास्तरावरील स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!