वैद्यकीय पथकाकडून नाऊरची पाहणी

0
नाऊर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे यांच्या सूचनेनंतर तसेच दैनिक सार्वमतच्या डास प्रतिबंधक फवारणीमुळे आरोग्य धोक्यात या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमी नंतर तत्पर दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन शिंदे यांच्यासह सभापती दीपक पटारे यांचे स्वीय सहायक रघुनंदन राक्षे, निमगाव खैरी आरोग्य केंद्राचे डॉ. आर. जे. धापते, व्ही. बी. राठोड आदीनी गावामध्ये गढूळ पाण्याची तसेच गटारीची पाहणी केली.
गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील गटारीमधील गाळ पूर्ण क्षमतेने काढण्यात आलेल्या नव्हता, तसेच या गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण होऊन अळ्या झाल्यामुळे डासांचा प्रार्दुभाव वाढला होता. या विषयीचे सविस्तर वृत्त दैनिक सार्वमत मध्ये प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाकडून तत्पर दखल घेऊन योग्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या विषयी ग्रामपंचायतला सूचना करताना डॉ. मोहन शिंदे म्हणाले, गावामध्ये त्वरित फॉगिंग मशिनने फवारणी करावी, मशिन बंद असेल जाफ्राबाद येथील मशिन वापरून दर महिन्याला फवारणी करावी, त्याचा अहवाल सादर करावा तसेच नाले, गटारी साफ करून त्यातील पाणी वाहते करणे, आणि एक दिवस कोरडा दिवस पाळणे, दूषित व खराब पाण्यामुळे पोटाचे अनेक आजार होत असतात गाळयुक्त पाण्यासाठी योग्य उपाययोजना करून एटीएम सारखे फिल्टर जर बसवले तर गावाची शुद्ध पाण्याची अडचण दूर होईल. यासह अनेक सूचना डॉ. शिंदे यांनी केल्या.

 

LEAVE A REPLY

*