Friday, May 3, 2024
HomeUncategorizedसात शिखरांच्या 'सप्तश्रृंगी गडा'ला हिरवाईचे कोंदण

सात शिखरांच्या ‘सप्तश्रृंगी गडा’ला हिरवाईचे कोंदण

सप्तश्रृंगी गड | इम्रान शाह

श्री सप्तश्रृंगी गड महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‘’अर्ध शक्तीपीठ’ मानले जाते. देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली असुन दोन्ही बाजुस 9 असे एकुण 18 हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे.

- Advertisement -

‘’सप्तश्रृंग’’ या शब्दाचा अर्थ ’सातशिखरे’ असा आहे. गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळतात.

गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत. गडाच्या पुर्वीस खोल दरीने विभागला गेलेला ’मार्कंडेय पर्वत’ आहे.

या ठिकाणी ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होते असे मानले जाते. या ठिकाणी त्यांनी दुर्गासप्तशतीची रचना केली चैत्र व अश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते.

गड नाशिक पासुन 60 कि.मी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे. देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन 4659 फुट उंचीवर आहे. आमचे प्रतिनिधी इम्रान शाह यांनी गडावरील टिपलेले काही आकर्षक छायाचित्रे.

- Advertisment -

ताज्या बातम्या