अहमदनगर : प्रत्यक्ष निसर्ग चित्रण स्पर्धेेत शेळके प्रथम

0

अहमदनगर : रचना कला महाविद्यालयाच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त तिसर्‍या खुल्या राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्ग चित्रण स्पर्धा व शालेय गटातील विद्यार्थ्यांकरीता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय निसर्ग चित्रकला स्पर्धेमध्ये मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टस्चा विद्यार्थी गजानन शेळके याने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय – अतुल गोंदले (भारती विद्यापीठ) रुपये 5 हजार व स्मृतीचिन्ह, तृतीय – सचिन घोडे, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल,नगर रुपये 4 हजार व स्मृतीचिन्ह आदिंनी आमदार संग्राम जगताप, पुण्याचे ज्येष्ठ चित्रकार सुरेश लोणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या बक्षिस समारंभ सोहळ्यास ज्येष्ठ चित्रकार वसंत विटणकर, कलाशिक्षक प्रमोद रामदिन, रचना कला महाविद्यालयाचे सचिव प्रशांत शेकटकर, आर्किटेक्ट इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश परदेशी, सचिव रमेश कार्ले, प्राचार्य सुभाष भोर, स्पर्धा संयोजक वर्षा शेकटकर, स्पर्धेचे परिक्षक प्रमोद कांबळे व संदिप छत्रबंद आदिंसह मोठ्या संख्येने स्पर्धक व नागरिक उपस्थित होते.
निसर्ग चित्र स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेले पुढील प्रमाणे- रुपेश सोनार (अभिनव महाविद्यालय), अक्षय शिंदे (जे.जे.स्कूल ऑफ आर्ट), सुभाष डांगे (कलाविश्व महाविद्यालय, सांगली), विशेष उल्लखनिय कलाकृती अजय माळी (जे.जे.स्कूल ऑफ आर्ट), रुपेश जांगिड (जे.जे.स्कूल ऑफ आर्ट), मोहन चौधरी (जे.जे.स्कूल ऑफ आर्ट), अभिनव जाधव (सातारा), शुभम केसूर (रहेजा स्कूल ऑफ आर्ट), संदेश मोरे (भारती विद्यापीठ).
शालेय चित्रकला स्पर्धा विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे : बालवाडी – दैविका दळवी, भव्या रसाळ, जयंत सारसर. 1 ली ते 2 री – अनामिक पाले, आदेश व्यापारी, साक्षी आव्हाड, 3री ते 4 थी – निल विधाटे, श्रृतिका गोरे, मधुरा गवळी, 5 वी ते 6 वी – आर्या वाघमारे, वैष्णवी उन्नी, हुमेरा शेख. 7 वी ते 8 वी – करण ढोकरीया,मतीन शहा, श्रावणी पाटील, 9 वी ते 10 – गणेश भांगरे, कृष्णकांत सुरवसे, अमृता पंडित, विशेष विभाग – अदिती मंगलाराम् आदि.

LEAVE A REPLY

*