नेचर क्लबचा ‘चला पक्षी मोजू’ उपक्रम

0
नाशिक । पक्षीतज्ञ डॉ सलीम अली यांची जयंती(12 नोव्हेंबर) देशभरात पक्षी गणना करून साजरी करण्यात आली.येथील नेचर क्लब तर्फे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या बाजूला असलेल्या शेतात, पडीक जमीन तसेच गवतावर राहणार्‍या पक्ष्यांची मोजणी आणि अभ्यास करून या पक्षीतज्ञाला श्रद्धांजली वाहण्यात आली.

दर वर्षी वन विभागातर्फे केवळ पान-पक्ष्यांचीच गणना केली जाते. मात्र गवतातील या पक्षी गणनेत सुमारे पंधरा प्रकारचे पक्षी दिसून आले. त्यामध्ये वेडाराघू, खंड्या, होला, कापशी घार, बुलबुल, दयाल, कोतवाल आदी पक्षी निदर्शनास आले. मुनिया तसेच सुगरण हे दोन्ही पक्षी हजारोंच्या संख्येने एकत्र राहत असल्याचे देखील दिसून आले ससाणा,जांभळा बगळा,कमळ पक्षी,राखी बगळा,मुग्ध बलाक,शेकाट्या,पांढर्‍या छातीची पान कोंबडी,मोर शराटी,मालगुजा,आदी पक्षी बघावयास मिळाले या परिसरात बाभळी चे वृक्ष मोठ्या प्रमाणात असल्याने पक्ष्यांची संख्या देखील त्यामुळे जास्त बघावायास मिळाली कापशी घारीचे घरटे देखील बघावयास मिळाले.

या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, भीमराव राजोळे,अमोल दराडे,सागर बनकर,गंगाधर आघाव,आकाश जाधव,शंकर लोखंडे,आशिष बनकर,प्रमोद दराडे, अमोल डोंगरे, पंकज चव्हाण, शंतनू चव्हाण यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

*