Type to search

नॅचरल गॅस : भारतीयांना स्वस्त, शुद्ध इंधनाचा सुरक्षित पर्याय

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सेल्फी

नॅचरल गॅस : भारतीयांना स्वस्त, शुद्ध इंधनाचा सुरक्षित पर्याय

Share

देशदूत डिजिटल विशेष

स्वच्छ इंधन योजनेअंतर्गत भारत सरकार येत्या गुरुवारी महत्वपूर्ण टप्पा पार पाडत आहे. शहरी गॅस पुरवठा योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होणार असून यामाध्यमातून देशातील १७४ जिल्ह्यांत पाईपलाईनद्वारे नॅचरल गॅसचा पुरवठा सुरु होणार आहे.  शुद्ध, स्वस्त, सुरक्षित गॅस नागरिकांना पुरवण्याचे स्वप्न साकारले जाणार आहे.

गॅस इकॉनॉमी बदलून टाकणारा एक ऐतिहासिक प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने हाती घेतला आणि त्याची फलश्रुती आता दिसायला लागली आहे.

गुरुवारी शहरी गॅस पुरवठा प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीतून होत आहे. यानिमित्ताने देशातील ४ जिल्ह्यांत पाईपलाईनद्वारे घराघरात शुद्ध, स्वस्त, सुरक्षित नॅचरल गॅस पुरवण्याच्या स्वप्नपूर्तीची पायाभरणी केली जाणार आहे.

नॅचरल गॅसचा वापर वाढला तर वाढते प्रदूषण कमी होईल. पेट्रोल, डीझेलवरचे अवलंबित कमी होईल. देशाचा महसूल वाचेलच पण अपघातांचे प्रमाणही कमी होणार आहे. ग्राहकांना घरपोच स्वस्त आणि शाश्वत पुरेसा गॅस पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होईल. वाहनचालकांना पेट्रोल डीझेलच्या तुलनेत अवघ्या २५ ते ३० टक्के खर्चात आपली इंधनाची गरज पूर्ण करता येईल. नॅचरल गॅसची उपयुक्तता देशासाठी इतकी आहे की, सीएनजी, पीएनजी वापरासाठी जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे असे मत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.

कार्बन डाय ऑक्साइड प्रदूषण २०३० पर्यंत ३० टक्के कमी करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोई यांनी ठेवले आहे. यासाठी सध्या सहा टक्के असलेला नॅचरल गॅसचा वापर किमान १५ टक्क्यांपर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

याचाच भाग म्हणून केंद्र सरकारने शहरी गॅस पुरवठा योजना आखली आहे. घरगुती वापरासाठी पीएनजी आणि वाहनांसाठी कॉम्प्रेस्ड गॅस (सीएनजी) पोहोचविण्याचा प्रकल्प युद्धपातळीवर हाती घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राने या प्रकल्पात आघाडी घेतली आहे. नॅचरल गॅसचा वापर करण्यामध्ये मुंबई, दिल्लीपेक्षा महाराष्ट्रातील पुणे आघाडीवर आहे. हे विशेष प्रदूषण कमी करण्यासाठी पुणेकरांनी नॅचरल गॅ  सची वाट    धरली आहे. पुण्यात आजमितीला १२०० शहर बसेस, १ लाख ८०   हजार कार, ५० हजार रिक्षा, एक लाख २५ हजार घरगुती ग्राहक, पाच हजार सोसायटी पाईपलाईनद्वारे सीएनजी गॅस वापरला जात आहे. त्यामुळे पुण्याचे प्रदूषण घटण्यास मदत झाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एमएनजीएल, भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेडचे (बीजी  आरएल) अधिकारी संचालक आता हे अभियान उर्वरित महाराष्ट्रात घेऊन जात आहेत. महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचे काम या दोन कंपन्या करीत आहेत.

एमएनजीएलकडे नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची तर बीजीआरएलकडे औरंगाबाद, सातारा, सांगली, अहमदनगरची जबाबदारी आहे. गुरुवारी या शहरांच्या नॅचरल गॅस सेवेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे.

त्यामुळे लवकरच या शहरांमध्ये पाईपलाईनद्वारे नॅचरल गॅस घराघरांत पोहोचणार आहे. या सेवेचा विस्तार करण्याची क्षमता आणि पायाभूत सुविधा आहे. पुढील किमान २० वर्ष पुरेल इतकी गॅस उपलब्धता आहे. मोठी गुंतवणूकही करण्याची कंपन्यांची तयारी आहे. फक्त नागरिकांच्या आणि स्थानिक संस्थांच्या सहकार्याची गरज आहे.

‘सीएनजी’चे फायदे

 • वाहनांच्या पारंपारिक द्रवरूप इंधनापेक्षा सीएनजी स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे.
 • सीएनजी कमी किंमतीत अधिक कार्यक्षमता मिळवून देतो त्यामुळे वाहनाचे मायलेज वाढण्यासाठी मदत होते.
 • सीएनजी क्रॅक केस ऑईल दुषित किंवा पातळ / सौम्य करत नाही त्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढविण्यासाठी मदत मिळते.
 • सीएनजी कार्बनडायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड व इतर सास्पेन्देद कण यांसारख्या अपायकारक उत्स्र्जकांचे प्रमाण कमी करते.
 • जागतिक तापमान वाढीचे परिणाम कमी करून सीएनजी पर्यावरण संरक्षण करते.
 • सीएनजी हेवेपेक्षा हलका असल्याने तो कोठेही साठून न राहता वातावरणात मिसळतो.

‘पीएनजी’चे फायदे

 • पाईपलाईन घरात आल्यामुळे सोयीस्कर
 • सुरक्षित
 • महिलांसाठी स्वयंपाकाचा स्वस्त पर्याय
 • पुन्हा भरून घेणे, नोंदवणे, वाट पाहणे, सिलेंडर बसवणे यापासून सुटका
 • अनुदानित एलपीजीपेक्षा स्वस्त
 • शेवटच्या क्षणी होणारी धावपळ नाही
 • चोरी, कमतरता, वाया जाने नाही
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!