Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील

Share

मुंबई | प्रतिनिधी

विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून राज्यपालांकडून कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड केली होती. दरम्यान, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या एकत्रित महाविकास  आघाडीचे सरकार स्थापन झाले.

आज सर्वानुमते कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची हंगामी विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वळसे पाटील यांना निवडीनंतर शुभेच्छा दिल्या.

 

 

आज दुपारी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. उद्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारची बहुमत चाचणी पार पडेल.

यापार्श्वभूमीवर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी फेरबदल करण्यात आले. यामध्ये दिलीप वळसे-पाटील यांची निवड विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!