स्व. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकत्मता दिन साजरा

0
नाशिक | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांनी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या प्रतिज्ञेचे वाचन करुन सर्वांना शपथ दिली.

याप्रसंगी प्रमोद पाटील, संतोष कोकाटे, सचिन धेंडे, ज्ञानेश्वर मालकर, नरेंद्र सोनवणे, बंडू गरुड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जयंती निमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते. इंदिरा गांधी चौक शालिमार, येथील श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच मनपा मुख्यालय राजीव गांधी स्वागत कक्ष येथे श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, गटनेते गजानन शेलार, दिक्षा लोंढे, प्रभाग सभापती शाहीन मिर्झा, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, शहर अभियंता यु. बी. पवार, जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब शिंदे, नितीन गंभीरे, गोपीनाथ हिवाळे, हुसेन पठाण, संतोष कान्हे, वीरसिंग कामे, देवीचरण खरात आदि उपस्थित होते

LEAVE A REPLY

*