आधारसंदर्भातील केंद्राच्या अध्यादेशावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

0

नवी दिल्ली, ता. २७ : सरकारी योजनांचा लाभ ‌घ्यायचा असेल, तर ३० जून पासून आधार कार्ड अनिवार्य राहिल, असा अध्यादेश केंद्राने काढला.

त्यावर अंतरिम बंदी घालावी ही याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणी आता ७ जुलै रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

केंद्र सरकारने नुकताच एक अध्यादेश काढून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी नागरिकाचे आधार कार्ड असणे अनिवार्य केले होते.‍ तसेच ज्यांनी अद्याप आधार कार्ड काढले नाही, त्यांच्यासाठी ३० जूनही अंतिम मुदत दिली होती.

त्यानंतर ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याने या प्रकरणी सुनावणीसाठी पुरेसा वेळ असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*