Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

ग्वाल्हेरमध्ये मिग -२१ विमानाला अपघात; दोघे पायलट सुरक्षित

Share

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील बीकानेरमध्ये हवाई दलाचे मिग -२१ विमान कोसळले असून सुदैवाने विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत. हे मिग -२१ प्रशिक्षण विमान होते ते रोजच्याप्रमाणे गस्त घालत असताना हा अपघात घडला.

या वर्षातील ही मिग दुर्घटनेची तिसरी घटना आहे. या विमानात एक ग्रुप कॅप्टन आणि एक स्क्वाड्रन लीडर बसला होता. यापूर्वी विंग कमांडर अभिनंदनच्या विमानास भीषण अपघात झाला होता. त्यानंतर मार्च मध्ये राजस्थानमधील बीकानेर येथे मिग -२१ क्रॅश झाले.

दरम्यान मिग विमान अपघाताच्या घटना सर्वसामान्य असून गेल्या काही वर्षांपासून हे विमान बदलण्याची मागणी होत आहे. तर एचएएलने निर्माण केलेल्या तेजसचा वापर करावा अशीहि चर्चा आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!