Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिषाला रौप्यपदक

Share
नाशिक | प्रतिनिधी  
सोनीपत हरियाणा  येथे झालेल्या युटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिषा कोटेचा हिने उतकृष्ट  कामगिरी करत सब जुनिअर मुलीच्या गटात रौप्य पदक पटकावले. तनिशा नाशिकची पहिली टेबल टेनिसपटू आहे, जिने राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारत रौप्य पदक पटकावून इतिहास घडविला आहे.
तनिषाला या स्पर्धेत २३ वे मानांकन प्राप्त होते. प्राथमिक फेरीतील पहिले तिन्ही सामने जिंकून मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीत खेळण्याआधी तिने पश्चिम बंगालच्या १४ व्या मानांकित सोमाली दत्ता, दिल्लीच्या चवथ्या मानांकित लक्षिता नारंग तसेच तामिळनाडूच्या १० व्या मानांकित नेहल व्यंकटासामी  यांचा  पराभव करत खळबळ माजवली.
उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित पश्चिम बंगालच्या स्नेहा भौमिक हीचा १५-१३, ११-९, ११-७, ८-११, ११-९ असा ४-१ ने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. परंतु अंतिम फेरीत हरियाणाचा प्रथम मानांकित सुहाना सैनी हिच्याकडून १०-१२, ११-८, ३-११, १०-११, ११-१३ असा ४-१ ने पराभव स्वीकारून रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
तनिषा कोटेचा नाशिक जिमखाना येथे  निलेश पंढीरकर व जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सराव करते. तिच्या  उत्कृष्ठ कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड, नासिक जिमखान्याचे सचिव राधेश्याम मुंदडा, संघटनेचे सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, राकेश पाटील, संजय वसंत, अजिंक्य शिंत्रे आदींनी  तिचे अभिनंदन केले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!