‘उड़ गई विकास कि चिडिया” या घोषवाक्याद्वारे भाजपची खिल्ली

0

रायपूर : विकासाच्या नावावर भारतीय नागरिकांना फसवण्याचे काम भाजपाद्वारे करण्यात येत आहे, त्यामुळे भाजप सरकारचा विकास कुठेतरी गुल झाला आहे, असे वक्तव्य काँग्रेसने केले आहे. टी-शर्टवर घोषवाक्य छापून विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेसने वठवली आहे.

काँग्रेस पक्षाने आता 1 लाख टी-शर्ट जारी केले असून, ‘उड़ गई विकास कि चिडिया” या घोषवाक्याद्वारे भाजपची  खिल्ली उडवली आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशा घोषवाक्यांचे टी-शर्ट घातले आहे. ‘विकास की चिडिया’ राज्यातील भाजप सरकारविरोधात हि मोहीम असल्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*