श्रावणी शनिवारनिमित्त नस्तपूरला भाविकांची प्रचंड गर्दी

0

नांदगांव दि ५ (प्रतिनिधी) ता. ५ : श्रावण महिन्यातील शनिवार, त्यात आज शनी प्रदोष असा दुहेरी मुहूर्त साधत भारतातील साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नस्तनपूर, ता. .नांदगाव येथील श्री क्षेत्र शनिमंदिर येथे भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

त्यात अशा शुभ मुहार्तावर नवसपूर्ती करण्यासाठी अनेक भाविकांनी आपला नवस फेडण्यासाठी योग्य वेळ समजून मोठ्या प्रमाणात इथे प्रसिद्ध असलेले दाल – बाटीचे जेवणाचे कार्यक्रम आयोजित केल्याने गर्दीत अधिकच भर पडली होती.

परंपरेनुसार दुपारी होणारी महानैवद्य आरती आज परिसरातील पिंपरखेड येथील जेष्ठ नागरिक रावसाहेब  गरुड व न्यायडोंगरी येथील पत्रकार जगन पाटील व सौ.मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आली, तर आरती नंतर संस्थांनच्या वतीने भाविकांना मोफत प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

सुमारे १२०-१३० नवस पूर्तीचे कार्यक्रम या क्षेत्रावर असल्याने आज भाविकांचा गर्दीचा उच्चांक मोडल्याचे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

*