Friday, May 3, 2024
Homeजळगावनशिराबाद ग्रामपंचायत निवडणूक होणारच!

नशिराबाद ग्रामपंचायत निवडणूक होणारच!

जळगाव – jalgaon

जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० अखेर मुदत संपुष्टात येत असलेल्या ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांची रणधुमाळी सुरू असून निवडणूक नामांकन भरण्याचा दि.३० डिसेंबर रोजी शेवटचा दिवस असतानाच मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास जळगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत होणार असल्याची घोषणा राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

असे असले तरी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्याप्रमाणे नशिराबाद ग्रामपंचायत निवडणूक होणार असल्याचे प्रशासन सुत्रांनी म्हटले आहे.

दरम्यान, नगरविकास विभागाकडून नगरपंचायतीची घोषणा करण्यात आल्याने नशिराबाद ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात येउ शकतो किंवा काय याविषयी अधिक माहिती घेतली असता सद्यस्थितीत ग्रामपंचायत निवडणूकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती देण्यात आलेली नाही.

तसेच नगरपंचायत बाबत झालेले शासनाचे अधिकृत पत्र जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेले नाही. आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही अंमलबजावणी होणार असल्याचे नोडल अधिकारी तथा महसुल उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या