Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गिरीशभाऊंची नाशिक नव्हे जळगाववर जास्त माया

Share

नाशिक । प्रतिनिधी

‘घार उडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी’ हा वाक्प्रचार भाजपचे संकटमोचक व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना तंतोतंत लागू पडतो. 15 ऑगस्टला ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्यांनी नाशिकऐवजी होमपिच असलेल्या जळगावला पसंती दिली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे नाशिक येथे ध्वजारोहण करतील. मुख्यमंत्र्यांच्या ‘दत्तक’ नाशिकला पालकमंत्री महाजन यांनी पुन्हा एकदा सापत्न वागणूक दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

गुरुवारी 15 ऑगस्टला देश स्वांतत्र्यदिनाचा 72 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. शासकीय प्रथेनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री या सोहळ्याचे प्रमुख अतिथी असतात. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडतो. मागील चार वर्षांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाला.

मात्र यंदा त्यांच्याकडे नाशिकसह त्यांचे होमपिच असलेल्या जळगावचेदेखील पालकमंत्रिपद आहे. शासनाकडून कोणत्या मंत्र्यांच्या हस्ते कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण सोहळा पार पडेल याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात नाशिकमध्ये ध्वजारोहण सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित राहणार आहेत.

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे जळगावला ध्वजारोहण करतील. यामुळे गिरीश महाजन यांची नाशिक नव्हे तर जळगाववरच जास्त माया असल्याचे पाहायला मिळत आहे.

महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असताना दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर जळगावच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला. महाजनदेखील नाशिकऐवजी जळगावच्या पालकमंत्रिपदासाठी जास्त इच्छुक होते. ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्यांनी नाशिकला डाववल्याने त्यांचे जळगाव प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!