Video : नाशिकला नदीजोड,रेल्वे कारखाना मार्गी लागणार – मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रिय रेल्वेमंत्री प्रभूंची स्पष्टोक्ती

0
नाशिक । गोदावरी खोर्‍यात सुमारे 25 टीमसी पाण्याची भर घालून नाशिकच्या पूर्व भागासह मराठवाड्याची पाणीटंचाई दूर करणारा नार-पार, दमणगंगा-पिंजाळ हा नदीजोड प्रकल्प आणि नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देणारा नाशिकरोडला सुमारे अडीचशे एकर परिसरात रेल्व कारखाना लवकरच मार्गी लागणार आहे, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

विमानतळाच्या धर्तीवर उभारणी प्रस्तावित असलेल्या मेळा बसस्थानकाच्या बांधकाम भूमीपुजन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते.

त्यावेळी त्यांनी नाशिकच्या जिव्हाळ्याचे पण अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले नदीजोड आणि नाशिकरोडला सुमारे 250 एकरवर प्रस्तावित असलेल्या रेल्वे कारखाना लवकरच मार्गी कसे लागणार, याची सद्यस्थिती जाहीररित्या बोलून दाखवली. त्यामूळे हे दोन प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याचा दिलासा जिल्हाला मिळाला आहे.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे,

महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सिमा हिरे, देवयांनी फरांदे, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह देओल, माजी आमदार माणिकराव कोकाटे, नगरसेवक सतीष कुलकर्णी, शिवाजी गांगुर्डे, दिनकर पाटील,संभाजी मोरुस्कर, एसटीच्या विभाग नियंत्रक यामीनी जोशी, लक्ष्मण सावजी, विजय साने आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळा बसस्टँड पोर्टचे भूमिपूजन समारंभाप्रसंगी संवाद साधतांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

मेळा बसस्टँड पोर्टचे भूमिपूजन समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधतांना

 

LEAVE A REPLY

*