नाशिक पेठ महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 3 ला जोडावा; खा. गोडसेंनी घेतली रस्तेविकासमंत्री गडकरींची भेट

0
नाशिक । भारत सरकारच्या परिवहनविभागामार्फत राष्ट्रीय महामार्ग 848 घोषित करण्यात आला. हा महामार्ग ठाणे जिल्हयाकडून गुजरातला जोडणारा पेठ मार्गे नाशिकमधून जातो.

हा महामार्ग नाशिक शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ला जोडला गेला आहे. मात्र यातील 15 किलोमीटरचा रस्ता शहरातून जात असल्याने रस्ते विकास करणे शक्य होणार नाही.

तसेच शहरातील वाहतूकिवरही यामुळे ताण पडेल त्यामूळे हा महामार्ग धागुर , गिरणारे, वाडीवर्‍हे मार्गे राष्ट्रीय महामार्ग 3 ला जोडावा असा प्रस्ताव खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रिय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांना सादर केला.

धागुर गिरणारे वाडीवर्‍हे हा राज्यमार्ग 37 हा धागुर ते वाडीवर्‍हे 42 किलोमीटरचा आहे. सद्यस्थितीत 5.5 मीटर खडीकरण, डांबरीकरण झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग 848 नाशिक पेठ हा पेठ धागुर गिरणारे वाडीवर्‍हे मार्गे असा बदल करून जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदरचा महामार्ग धागुर , दुगांव , ओझरखेड , गणेशगांव , नाशिक , महीरवणी, दहेगांव मार्गे वाडीवर्‍हे राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यास नाशिक शहराच्या दृष्टीने शहरातील वाहतुकिवर ताण कमी होईल.

शहराभोवती रिंगरोड तयार होण्यास मदत होईल. आणि 2026ः2027 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळयाच्या दृष्टीने सोयीचे होईल असे यावेळी सांगण्यात आले. याबाबत निश्चितपणे या सुचना विचारात घेउ असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

LEAVE A REPLY

*