स्टार्टअपमध्ये नाशिकचा समावेश

0

नाशिक । भारत सरकारने नीती आयोगाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून स्टार्टअप इंडिया आणि डिजिटल इंडिया असे उपक्रम राबवण्यात येत आहेत.

या धर्तीवर गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश यांनी आपापल्या राज्याची स्टेट स्टार्टअप अ‍ॅण्ड इनोवेशन पॉलिसी अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. यात नाशिकचाही समावेश करण्याची मागणी खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रीय प्रधान सचिवांकडे केली.

नीती आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि महाराष्ट्रातील सर्व भागधारकांचे विचार आणि मते लक्षात घेता महाराष्ट्र स्टेट इनोवेशन अ‍ॅण्ड स्टार्टअप पॉलिसी 2017 तयार करत आहे. मुंबई आणि पुणे येथे स्टार्टअप इकोसिस्टीम उपलब्ध आहे.

त्याचप्रमाणे नागपूर आणि औरंगाबाद येथेही अशाप्रकारचे कार्यक्रम राबवून स्टार्टअप इकोसिस्टीम विकसित करण्यात येणार आहे. नाशिक येथे ही इकोसिस्टीम तयार असल्याचे यावेळी खा. गोडसे यांनी सांगितले.

नाशिक येथे डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर आणि नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर आहे. त्यामुळे नागपूर आणि औरंगाबादपूर्वी नाशिक येथे अ‍ॅक्सलेटर स्थापित करणे शक्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*