Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आधार नोंदणीसाठी जावे लागते तालुक्याला; डांगसौंदाणे परिसरातील जनतेची दमछाक

Share

डांगसौंदाणे | वार्ताहर 

ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थी व पालकांची आधार नोंदनीसाठी होणारी दमछाक रोखण्यासाठी परिसरातील 20 ते 25गावांचे केंद्रबिंदु असलेल्या डांगसौंदाणे येथे आधार नोंदणी केंद्र सुर करण्यात यावे या आशयाची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आधार नोंदणी शिवाय शालेय विद्यार्थीना शाळेत दाखल करता येत नसल्याने तर अंगणवाडीतून मिळानारा पोषण आहार ही आधार नंबर शिवाय मिळत नसल्याने पालकाना आपल्या पाल्यांना घेऊन सटाणा किंवा विरगाव येथे आधार नोंदनीसाठी जावे लागते आहे. या आधार केंद्रावर स्थानिकांचीच जास्त गर्दी होत असल्याने दोन -दोन दिवस नंबर लागत नसल्याने विद्यार्थी व पालकांची मोठी दमछाक होताना दिसत आहे .

अनेक पालक पहाटेच आधार नोंदनीसाठी नंबर लावत आहेत. तर साल्हेर ,मानुर परिसरातील आदिवासी जनतेला तूरळक एसटी बससेवा उपलब्ध असल्याने या नागरिकांचे आधार नोंदणी केंद्रावर उशिरा पोहचल्या मुळे  नंबरच लागत नसल्याने मोठ्या प्रमानावत आर्थिक चुराडा होत आधार नोंदनीसाठी एक एक आठवडा काम धंदे बंद करुण चक्रा माराव्या लागत आहेत.

या साठी प्रशासनाने डांगसौंदाणे या मध्यवर्ती बाजार पेठेच्या ठिकाणी आधार नोंदणी केंद्र सुरु करावे अशी मागणी या भागातील आदिवासी जंनतेकडून होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!