Type to search

आवर्जून वाचाच गणेशोत्सव जळगाव नवरात्री

नशिराबाद : कर्तव्यदक्ष पोलीसांच्या त्यागातूनच शांतता व सुरक्षितता शाबूत – रामचंद्र पाटील

Share

नशिराबाद, ता.जळगाव । वार्ताहर

येथे गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात उत्साहात व शांततेत पार पडले. याचे श्रेय पोलीस दलाला आहे. उत्सव साजरा करताना पोलीस, शासन, मंडळे, नागरिक यांच्या एकत्रित भावना महत्त्वाच्या असतात. सगळ्या भावना एकत्र येऊन काम होते, तेव्हा उत्सवात यश मिळते. पोलिसांनी कर्तव्याच्या पलिकडे जाऊन भावना ठेवल्या, त्या भावना फार महत्त्वाच्या आहेत. पोलिसांच्या या चांगल्या कामाचा सन्मान करणे ही नशिराबादची संस्कृती आहे. ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी नशिराबाद येथील स्वयंशोध फाऊंडेशनच्या वतीने नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे, सर्व पोलीस सहकारी, होमगार्ड यांचा सत्कार करण्यात आला.

कृतज्ञता सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द वक्ते व लेखक रामचंद्र पाटील व नशिराबाद सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रा.युवराज वाणी उपस्थित होते.

यावेळी स्वयंशोध फाऊंडेशनने पोलीस बांधवांचा

सत्कार सोहळा आयोजीत केल्याबद्दल व त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल प्रमुख वक्ते रामचंद्र पाटील यांनी कौतुक केले व कर्तव्यदक्ष पोलीसांच्या त्यागातूनच शांतता व सुरक्षितता शाबूत राहत असल्याचे सांगितले.

प्रा.युवराज वाणी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्व समाज बांधवांच्या सण, उत्सवा दरम्यान पोलीस रात्रंदिवस आपल्या सुरक्षेसाठी तैनात असतात. जीवाची पर्वा न करता आपले कुटूंबापासून लांब राहत मंगलदायी सण, उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काळजी घेत असतात. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांचे सहकार्य महत्वाचे असते यासाठी आपणही पोलीस यंत्रणेला मदत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव शांतेत पार पाडण्यासाठी गावातील सर्व मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी तसेच ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केल्याचे नमूद केले. व स्वयंशोध फाऊंडेशनने पोलीस विभागाचा केलेला सत्कार हा प्रेरणादायी असल्याचे सांगत स्वयंशोध फाऊंडेशनने केलेल्या गौरवाबद्दल आभार मानत पोलीस विभागातर्फे त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वयंशोध फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, संस्थापक सचिव धिरज सैतवाल, उपाध्यक्ष पवन तिडके, संचालक भरत तिडके, दिनेश सावळे, सुशिल भावसार, नरेंद्र धर्माधिकारी, अक्षय वाणी यांनी परिश्रम घेतले.

सुत्रसंचलन आर.एल.पाचपांडे यांनी तर आभार श्रवण कॉम्प्युटरचे संचालक हरीश पाटील यांनी मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!