Type to search

जळगाव

नशिराबाद : पालखी महोत्सवाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

Share

नशिराबाद, ता.जळगाव । वार्ताहर –

येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पालखी मिरवणूक व ज्ञानेश्वरी ग्रंथराज मिरवणूक सोहळा पार पडला. या मिरवणूक सोहळ्यात अनेक भाविक भक्तगण उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती, अनेक महिला डोक्यावर कलश व ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. पालखी मिरवणूक श्री संत सावता मंदिरापासून निघत मेनरोड, नाईकवाडा मार्गे परत श्री संत सावता महाराज मंदिरात येऊन सांगता झाली. किर्तन सप्ताहाची सांगता सकाळी 10 ते 12 वाजता ह.भ.प. राजेंद्र महाराज पिपंळकोठेकर यांचे किर्तनाने झाली. यानंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सदर सप्ताहास दि.6 नोव्हेंबर पासून सुरूवात झाली होती. सप्ताहातील कार्यक्रमात रोज सकाळी 5 वा. काकडा, 7.30 ते 8.30 विष्णुसहस्त्रनाम, 8 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरीपाठ व रात्री 8 ते 10 किर्तन असे कार्यक्रम उत्साहात पार पडले.

 

गिताबाई माळी यांचा सत्कार

सप्ताहाच्या सांगता प्रसंगी काल्याचे किर्तन झाल्यानंतर श्री संत सावता महाराज मंदिरास रू.51 हजाराची देणगी देणार्‍या गिताबाई शामराव माळी यांचा सत्कार मंदिर संस्थानच्यावतीने करण्यात आला.

सप्ताहासाठी ह.भ.प. सुनिलशास्त्री महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. मृदुंगाचार्य, गायनार्चा ह.भ.प. सुपाशेठ सदाफळे, सुरेश तुकाराम माळी, रमेश पाटील, संजय महाराज, समस्त माळी पंच यांचेसह सर्व समाज बांधव ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!