Type to search

जळगाव

नशिराबाद येथे रोटा व्हायरस लसीकरणाचा शुभारंभ

Share

नशिराबाद, ता.जळगाव (वार्ताहर) – महाराष्ट्र शासन आरोग्य विभागातर्फे लहान बालकांना मोफत रोटा व्हायरस लस दिली जात असून या लसीकरण मोहीमेचा शुभारंभ नशिराबाद आरोग्य केंद्रात दि.२२ रोजी करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, आरोग्य सभापती दिलीप पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर, पं.स.सभापती यमुनाबाई रोटे, जि.प.सदस्य लालचंद पाटील, गटविकास अधिकारी एस.बी.सोनवणे, डॉ.प्रमोद पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चव्हाण, डॉ.इमान तडवी, डॉ.समाधान वाघ, सरपंच विकास पाटील, डॉ.सी.सी.पाटील, डॉ.बाळासाहेब वाभडे आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत रोटा व्हायरस लसीची माहिती देणार्‍या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी सांगितले की, लहान मुलांना जुलाबामुळे डिहायड्रेशन होऊन बालके दगावण्याचे प्रमाण वाढत असून या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने दीड ते साडेतीन महिन्याच्या बालकांना `रोटा व्हायरस’ लस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. या कार्यक्रमा दरम्यान आरोग्य केंद्र आवारात मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!