Type to search

Featured जळगाव

video नशिराबाद नगरीत हरिनामाचा गजर ; दिंडी सोहळ्याने वेधले सर्वांचे लक्ष

Share

नशिराबाद, ता.जळगाव –

येथील ग्रामस्थांच्या वतीने गेल्या 31 वर्षांपासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण महोत्सव साजरा करण्यात येतो.

दि.5 जानेवारी रोजी सप्ताह समाप्ती निमित्त भव्य दिंडी सोहळा व महाप्रसाद वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या ग्रामोत्सवाचा समारोप ह.भ.प.भरत महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. या प्रसंगी ग्रामस्थ, गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच आजी-माजी पदाधिकारी यांचेसह जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचा सहभाग लाभला.

दिंडी सोहळ्यात शालेय विद्यार्थिनींचे लेझीम पथक, महिलांनी डोक्यावर घेतलेले तुळशी वृंदावण, ज्ञानेश्वरी, झांज पथक, आकर्ष देखावे आदींनी सर्वांचे लक्ष वेधले होते. गावातील मुख्य रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

या आनंद सोहळ्यात राजकीय पदाधिकारी, हिंदु-मुस्लीम समाज बाधव यांनी सहभागी होऊन फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!