Type to search

जळगाव फिचर्स

नशिराबाद (ता.जळगाव) येथे गीता जयंती उत्सव

Share

नशिराबाद, ता.जळगाव –

येथील परमार्थ सेवा केंद्र व न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरा द्वारे गीता जयंती उत्साहात साजरी. सर्वप्रथम जगाची माऊली ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे व परमपूज्य अशा श्रीमद्भभागवत गीतेचे पूजन व वैकुंठवासी हभप सुरेश महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हभप प्रभाकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

या दिंडी सोहळ्याची सुरुवात श्री विठ्ठल मंदिरापासून तर सांगता परमार्थ सेवा केंद्रा जवळ करण्यात आली.

या दिंडी सोहळ्यात माध्यमिक विभागाचे उपशिक्षक आर.एल.पांचपांडे यांच्या मार्गदर्शनातून लेझीम पथक तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रविण महाजन यांच्या मार्गदर्शनातून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा धारण केलेली होती.

या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी ‘गीता से क्या नाता है गीता हमारी माता है’ अशा पद्धतीने गीतेचा जयजयकार केला. तसेच गावातील भजनी मंडळाने देखील टाळ व मृदुंगाच्या साह्याने संपूर्ण नशिराबाद शहर भजना द्वारे आनंदमय केला.

या दिंडी सोहळ्यात गावातील प्रतिष्ठित नागरिक गणपत सोमा पाटील, जनार्दन काका माळी, किशोर पाटील, विजय सरोदे, सुनील पाटील, मोहन येवले, धीरज पाटील, डिगंबर रोटे, कमलेश नेहते, चंदू भोळे, पितांबर वाघुळदे, गावातील भजनी मंडळ व प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

पालखी सोहळ्याची समाप्ती परमार्थ सेवा केंद्रा जवळ होऊन  पालखी  सोहळ्यातील विद्यार्थ्यांना खाऊ राजगिरा लाडू, केळी चॉकलेट देण्यात आल्या. त्यानंतर गीतापारायण करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन ह.भ.प. प्रभाकर महाराज यांच्या मार्गदर्शनातून करण्यात येऊन त्यांना  धीरज पाटील, मोहन येवले, कमलेश नेहते व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!