Type to search

Breaking News जळगाव

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नशिराबाद ग्रामस्थ सज्ज

Share

नशिराबाद, ता.जळगाव (वार्ताहर)-

भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात दाखल झाले आहेत. महाजनादेशयात्रेचे पारोळा, अमळनेर, धरणगाव येथे जल्लोषात स्वागत झाले. जळगाव भेटीनंतर ते भुसावळकडे मार्गक्रमण करणार आहेत. नशिराबाद महामार्ग क्र.६ लगत असल्याने येथूनच ते जात असल्याने येथील शालीमार हॉटेल जवळ थांबून ग्रामस्थांची थावती भेट घेवून पुढील प्रवास करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. याप्रसंगी त्यांना नशिराबाद येथील समस्यां संदर्भात निवेदन दिले जाणार असल्याचे सांगितले जात असून यात प्रामुख्याने महामार्गा चौपदरीकरण कामात गावालगत ठिकठिकाणी उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीसह गाव विकासाच्या दृष्टीने समस्या मांडल्या जाणार आहेत. साहेबांची याठिकाणावरून जाण्याची वेळ चार वाजेचे दिली असल्याने महामार्गावर गर्दी जमली आहे. मात्र त्यांना येण्यास उशीर होऊ शकतो अशी माहितीही भाजप कार्यकर्त्यांकडून मिळत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!