Type to search

Breaking News जळगाव

नशिराबाद : भागपूर प्रकल्पग्रस्त पावरा समाज लाभापासून वंचीत

Share

नशिराबाद, ता.जळगाव । वार्ताहर

जळगाव तालुक्यातील भागपूर शिवारातील सुमारे 250 हेक्टर शेतजमिन व गाव तापी नदीवरील शेळगाव बॅरेज वरूण पाईपलाईनद्वारे आणण्यात येणार्‍या पाण्यामुळे प्रकल्पबाधित होणार आहे. यात मोल मजूरी करणारे व 20 ते 25 वर्षांपासून रहिवाशी असलेले पावरा समाजातील 20-25 कुटूंब पुनर्वसन लाभापासून वंचीत राहत आहेत. त्यांना पुर्नवसनाचा लाभ मिळावा यासाठी नशिराबाद-भादली गटाचे जि.प.सदस्य लालचंद पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांसह पुनर्वसन अधिकारी, जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील जळगाव तापी पाटबंधारे प्रकल्प मंडळ, उपसा सिंचन व बांधकाम विभाग जळगाव यांना नुकतेच निवेदन दिले. याप्रसंगी पावरा समाज कुटूंबप्रमुखांसह ललीत बर्‍हाटे उपस्थित होते.

याबाबत सविस्तर असे की, तापी नदीवर होत असलेल्या शेळगाव बॅरेजचे पाणी पाईपलाईनच्या साह्याने उचल करून भागपूर शिवारात त्याची साठवण केली जाणार आहे. त्या पाण्यामुळे या शिवारातील शेतजमिन व गाव प्रकल्पबाधित होणार आहे. व भागपूर गाव पाण्याखाली जात असल्यामुळे लवकरच त्या गावाचे पुर्नवसन होवून ते नवीन ठिकाणी स्थलांतरी करण्यात येणार असल्याचे समजते. त्यासाठी रहिवाशी घरांचे सर्व्हेक्षण सुध्दा करण्यात आले आहे.

मात्र येथे मोलमजूरी करण्याच्या उद्देशाने आलेले व सुमारे 25 वर्षांपासून वास्तव्यास असलेले पावरा समाजातील 20 ते 25 कुटूंब नावावर रहिवाशी जागा नसल्याने त्यांचा पुर्नवसन यादीत समावेश केला नसल्याचे संबंधीत अधिकार्‍यांनी सांगितले. त्यांच्या नावे आजमितीस जागा नसली तरी ते या गावात अनेक वर्षांपासून रहीवाशी आहेत,त्यांना मतदानाचा हक्क, रेशनकार्डधारक व आधारकार्ड आदी सुविधांचा उपभोग घेत आहेत.

त्यामुळे शासनाने या आदिवासी समाजात मोडल्या जाणार्‍या व मोलमजूरी करून पोट भरणार्‍या गरीब कुटूंबांना पुर्नवसन यादीमध्ये समाविष्य करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर जि.प.सदस्य लालचंद पाटील यांचेसह प्रकल्पग्रस्त व पुर्नवसन लाभापासून वंचीत असलेल्या पावरा समाज कुटूंबीयांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!