Type to search

Breaking News Featured नंदुरबार नाशिक मुख्य बातम्या

नाशिक ग्रामीणच्या वाहनाला नंदूरबारनजीक अपघात; १० पोलीस कर्मचारी जखमी

Share

नंदुरबार | प्रतिनिधी 

नंदूरबार येथे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौर्‍यानिमित्त बंदोबस्तासाठी मदत म्हणुन गेेलेल्या नाशिक ग्रामिण पोलीस दलाच्या वाहनास अपघात होऊन 10 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना तळोदा – नंदुरबार रोडवर गुरूवारी (दि.21) रात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा नंंदुरबार दौरा गुरवारी सुरू होता. यासाठी नाशिक येथील ग्रामिण पोलीस दलाचे पथक मदतीसाठी पाठवण्यात आले होते.

हे पथक धाडगाव येथे कार्यरत होते. बंदोबस्त उरलकल्यानंतर नंदुरबार जिल्हा अधिक्षक कायालयात नोंद करण्यासाठी हे पथक नंदुरबारला येण्यासाठी माघारी निघाले होते.

तेथून नंदुरबारला परत येत असताना नंदुरबार शहरा नजीक पथराई गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले. परंतु वेळीच प्रसंगावधान राखत अन्य मोठ्या वाहनांना धडक बसणार नाही याची काळजी घेत चालकाने वाहन रस्त्याच्या खाली वळवले. यानंतर ते एका झाडास धडकले. त्यामुळे पोलीस व्हॅन रस्त्याच्या बाजूला जाऊन खड्ड्यात आदळली.

या व्हॅनमधून 18 पोलीस कर्मचारी प्रवास करीत होते. त्यातील 10 जण जखमी झाले. त्यांना तातडीने नागरीक तसेच नंदुरबार पोलीसांनी नंदुरबार येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान सर्वांची प्रकृती स्थितर असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगीतले.


सर्व सुरक्षित

राज्यापालांच्या दौर्‍या निमित्त नाशिक ग्रामिण पोलीस दलाचे पथक मदतीसाठी नंदुरबार येथे गेले होते. दौर्‍यानंतर परत माघारी येातना रात्री दिड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. परंतु अपघात किरकोळ असून सर्व कर्मचारी सुरक्षीत आहेत. किरकाळ जखमी झालेल्या कर्मचार्‍यावर नंदूरबार येथे उपचार सूर आहेत.

– डॉ. आरती सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!