नाशिकच्या ‘शिवशाही’ नागरपूरच्या दावणीला; नाशिक एसटी डेपो ठरले औट घटकेचा राजा

0
नाशिक । नाशिकमधील विज निर्मिती केंद्रासह अनेक शासकीय कार्यालये नागपूरला पळविण्याचे सत्र सुरूच असून शिवसेनेचेे मंत्री असतानाही नाशिकला मिळालेल्या शिवशाही बस अवघ्या एका दिवसात नागपुरला पळविण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. याद्वारे नाशिककरांना केवळ औट घटकेचा राजा होण्याचा मिळाल्याची चर्चा आहे.

राज्य परिवहन विभागाचे मंत्री दिवाकर रावते यांनी मोठ्या घोषणा करत सुरू केलेल्या शिवशाही बस नाशिककरांना मात्र औट घकेची सेवा ठरली. नाशिक एसटी डेपोमध्ये रविवारी (दि.1)दाखल झालेल्या व प्रवाशांचा प्रचंढड प्रतिसाद मिळालेल्या4 शिवशाही बस तातडीने नागपूर डेपोकडे देण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

त्यामुळे नाशिकच्या वाटेला आलेल्या चार बस पहिल्याच दिवसाच्या सेवेनंतर नागपूरला रवाना झाल्या आहेत. आज दुपारपर्यंत सर्व बस व्हाया पुणे नागपुरच्या दिशेने रवाना झाल्या.

नाशिक-पुणे महामार्गावर यापूर्वी शिवनेरी, हिरकणी व साध्या बसेस धावत होत्या. त्यातील 11 हिरकणींपैकी चार बसेस कमी करून त्याऐवजी शिवशाही बसेसचा समावेश करण्यात आला होता. तर पुढे शिवनेरी या वातानुकुलीत बस बंद करण्याची तयारी करण्यात येत होती.

रविवारी दाखल झालेल्या चार बसद्वारे नाशिक-पुणे-नाशिक अशी सेवा देण्यात आली. सोमवारी सकाळी 11.15 वाजता, दुपारी 12.15, दुपारी 1.15 आणि दुपारी 2.15 वाजता या बस नाशिकहून पुण्याकडे निघाला. या चारही बसेसला भरघोस प्रतिसाद लाभला. शिवशाही बसच्या प्रतिटप्प्याचे भाडे इतर बसच्या तुलनेत कमी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने यापूर्वीच घेतल्याने प्रवाशांमध्ये या बसचे आकर्षण आहे.

नाशिक डेपोकडील चार आणि पुणे डेपोकडील चार अशा एकूण आठ शिवशाही बसेसद्वारे नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा देण्यात आली. नाशिकमध्ये टप्प्याटप्प्याने 20 बसेस मिळणार होत्या, त्यात स्ल्पिर कोचसुद्धा सामावेश होता. मात्र, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास मंत्रालयीन स्तरावरून एसटी महामंडळाचा अजब फतवा निघाला.

यामुळे नाशिक आणि पुणे डेपोकडील नव्याने दाखल झालेल्या प्रत्येकी चार बसेस तातडीने नागपूरला पाठविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगीतले.

 

LEAVE A REPLY

*